'भूमिका : पडदयामागच्या पालकाची' - with Kiran Yadnyopavit [Writer, Director & Actor- Marathi & Hindi film and TV Industry]
Manage episode 358839797 series 3460479
सिनेसृष्टी आपल्या सगळ्यांनाच लहानपणापासून आकर्षित करत आलीये .. त्या वलयामध्ये वावरणाऱ्या लोकांबद्दल अप्रूप , कौतुक , उत्सुकता , आकर्षण , समज -गैरसमज हे सगळं कधीनाकधी आपल्या मनात येऊन गेलेलंच असतं. या क्षेत्रांत येणं , काम करणं आणि त्या वलयात राहूनही स्वतःचं वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवणं ; त्याचा समतोल राखणं अशी तारेवरची कसरत उत्तमरित्या सांभाळणं; खरच खूप आवाहनात्मक आहे.बरेच दिवसांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या 'parenting ' विषयी एक एपिसोड करावा असं खूप मनात होतं . कसे पेलत असतील ते ही जबाबदारी ? कशा पद्धतीने वाढवत असतील आपल्या मुलांना या सगळ्या त्यांच्या व्यापातून ? त्यांची खऱ्या आयुष्यातली एक पालक म्हणून भूमिका काय असेल ? असे अनेक प्रश्न होते मनात आणि त्यांचीच उकल करावी यासाठी जेव्हा विचार सुरु झाला तेव्हा एकच व्यक्ती डोळ्यासमोर आली आणि त्यांनाच या एपिसोड साठी आणायचं असं क्षणात ठरवलं आणि ते म्हणजे किरण दादा अर्थात किरण यज्ञोपवित !!!
चला तर मग जाणून घेऊया “भूमिका : पडद्यामागच्या पालकाची” आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग च्या आजच्या भागातून !!!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
73 episodios